Loading...
Back to Top

कार्य केंद्र बद्दल माहिती

आमची माहिती    जगद्‌गुरु श्रीसाईनाथमहाराजांनी ‘श्रध्दा, सबुरी व मानवता’ याची शिकवण समाजाला दिली. वंदनीय दादांच्या माध्यमातून स्थापलेला गुरुमार्ग, हा या तीन तत्त्वांवर आधारीत आहे. मानवाच्या अज्ञानामुळे कुटुंबात व समाजात निर्माण झालेले असमाधान व अश्रध्दा दूर करण्यासाठी हे कार्य कायान्वित झाले. ज्यावेळी देवदेवतांचे कृपाशीर्वाद, अवतारी पुरुषांची पुण्याई व वाडवडिलांचे सत्कर्म स्वतःच्या जीवनात धारण करण्यास सामान्य मानवाचे सामर्थ्य अपुरे पडले, त्यावेळी हे पूर्वसंचित सत्कर्म व मानवी जीवन यांची सुसंगती साधावी यासाठी वंदनीय दादांच्या माध्यमातून हे कार्य उदयास आले.

    अशा या कार्यपध्दतीच्या लोककल्याणाच्या कर्तव्यातील एक महत्त्वाचे अंग म्हणजे ‘कार्यकेंद्र’ आहे. सामान्य भक्तभाविकांच्या जीवनातील दुःख दूर व्हावे व त्याचे जीवन ईश्वरमय व्हावे या सद्‌हेतूनेच कार्यकेंद्रांची स्थापना दिव्यपूण्य विभूतींच्या आज्ञेने झाली. आजच्या परिस्थितीत सामान्य भक्ताला जरी देवाबद्दल, धर्माबद्दल, उपासनेसाधनेबद्दल आस्था निर्माण झाली तरी तो देवधर्म, धर्माचरण व उपासना करण्यासाठी लागणाऱ्या योग्य आचार-विचारांचा अभाव असल्यामुळे जे नित्याचे धर्माचरण व देवतार्जन आपल्या हातून घडणे अत्यावश्यक आहे, ते घडत नाही. याबद्दल आस्थापूर्वक विचार करुन भक्तांकडून योग्य पारमार्थिक आचरण घडवण्यासाठी योग्य अशी जागा असावी म्हणून कार्यकेंद्रांची स्थापना करण्यात आली. सहाजिकच कार्यवेंद्रांची स्थापना कोणाच्याही घरात न करता एक स्वतंत्र्य वास्तू या स्वरुपात करण्यात आली. तेथे स्नानादि विधीपासून आरती साधना, ॐकार साधना, मुलाखत साधना, प्रार्थना, संवेदना, कामकाज इ. चा लाभ भक्तांना व्हावा याची सर्व व्यवस्था असते. प्रत्येक उपक्रमासाठी. एक ठराविक वेळ निश्चित केलेली असून त्याप्रमाणे सर्व उपक्रम पार पडतात. वंदनीय दादा म्हणतात ‘केवळ कार्यार्थ सेवा करावयाची असा जर उद्देश असता, तर हे कार्य कोणाहि भक्ताच्या घरी वास्तव्य करुन करता येण्यासारखे होते. यासाठी एवढा खर्चिक खटाटोप करावयाचे कारण नव्हते. परंतु आपल्या जीवनातील अडिअडचणी निवारण व्हाव्यात, आपल्या जीवनाचा विकास व्हावा, आपल्या मुलाबाळांना योग्य अशा धर्माचरणाची सवय होऊन, त्यांच्या जीवनाचा पाया धार्मिक आचार विचारांच्या भूमिकेवर सुदृढ व्हावा, या सर्व हेतूंनी साकार झालेले हे कार्य जगातील दुःखी लोकांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. ते केवळ ह्या कार्यातील प्रमुख साधक व नियुक्त सेवकयांच्यासाठीच नसून, ते आपल्या सर्वांसाठी आहे. आपण जरी आपल्या अडिअडचणी निवारण व्हाव्यात ह्या भूमिकेतून या कार्याकडे पाहत असलात, तरी हे कार्य तुम्हा भक्तांना संकटग्रस्त म्हणून संबोधित नाही. कार्यवेंद्रावर आपण उपस्थित झाल्यावर आपल्या सुखदुःखांची विचारणा आदराने करुन व विचारात घेऊन, तुमच्या ऐहिक व कौटुंबिक अडचणी आपल्याच आहेत, अशा पूज्यभावनेने व विचाराने श्रीसद्‌गुरुकृपाशीर्वादाने आपल्या हितासाठी ही कार्यपद्धती कार्यान्वित केली आहे’.

एखाद्या देवळात गेल्यानंतर जे समाधान प्राप्त होते त्यापेक्षा एक वेगळेच समाधान कार्यवेंद्रावर ॐकार साधनेला, आरती साधनेला, मुलाखत साधनेला व इतर उपक्रमाना हजर राहिल्याने मिळते. याचे कारण म्हणजे कार्यवेंद्रावर असणाऱ्या परमपूज्य साईनाथ महाराज, विभूती व वंदनीय दादा यांच्या फोटोमागे संचित असलेले सत्कर्माचे वलय आहे. मागील अनेक जन्मांचा सत्कर्माचा साठा बरोबर घेऊन वंदनीय दादांनी या भूतलावर जन्म घेतला. त्या सत्कर्माच्या ठेव्याला दुःखीकष्टी लोकांना सुखी करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी श्रीसाईनाथ महाराज या गुरुतत्वाला अधिष्ठित केले व त्यांच्या चरणी तो सत्कर्माचा ठेवा अर्पण करुन ठेवला. याच गुरुतत्वातून वातावरणामध्ये ज्या लहरी निर्माण होतात त्याद्‌वारे सर्व कार्य घडत आहे. त्यातूनच कामकाजाला येणाऱ्या भक्तांच्या दुःखाचे निवारण होते. भक्तांना दिलेल्या उदी, दोरे, प्रसाद, इत्यादी माध्यमातून गुरुंच्या सत्कर्माच्या ठेव्यातील कृपाशीर्वाद प्रवाहित होत असतो. विविध उपक्रमांसाठी उपस्थित राहिलेल्या भक्तांचे त्यांच्या नकळत विमोचन होत असते. यासाठी केवळ कार्यवेंद्रावर नियमित हजर राहून परमपूज्य जिलानीबाबांनी आखून दिलेल्या शिस्तीप्रमाणे वागणे हे आवश्यक असते. cebefojeleerue cetefle& efn ef$eefceleer(3- dimensional) असल्याने तिची प्रतिष्ठापना होणे आवश्यक असते व त्यामुळे काही औपचारांची बंधने असतात. परंतु कार्यवेंद्रावर पूजनात ठेवलेले सर्व फोटों हे सर्व द्विमिती(2- dimensional) असतात, त्यांना केवळ रुंदी व उंची असते.त्यामुळे त्यांची प्रतिष्ठापना करणे किंवा औपचारांचे बंधन नसते. वंदनीय दादा सांगत की ह्या फोटोंची तिसरी मिती (खोली) ही भक्तांनी आपल्या भक्तीने निर्माण करावयाची असते.

कार्यवेंद्रावरील योग्य आचरणाचे महत्व किती आहे हे विभूतींनी स्पष्ट केले आहे. ते असे की, ‘सद्‌गुरुंनी लोककल्याणार्थ स्थापन केलेले प्रत्येक कार्यवेंद्र हे सद्‌गुरुकृपाशिर्वादाचा बहुमोल ठेवा आहे. त्या ठिकाणी वास करीत असलेली आदीगुरुतत्वे आपल्या जन्मजन्मातरीतील कर्मांचा (प्रतिकूल कर्माचा) नाश करुन आपल्याल अपेक्षित सुख, शांती, समाधान, संपत्ती, संतती, दिर्घायुष्य देण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे तेथे उपस्थित रहाणाऱ्या भक्तभाविकांनी अतिशय विनयशील अशी आपली वागणूक ठेवून प्राप्त जन्मात सुख, शांती समाधानाचा लाभ करुन घेतला पाहिजे. आपल्या अडचणीत दाखविलेला आपलेपणा दाखवून आपल्या सुखदुःखात सहभागी होण्याची जी भूमिका गुरुमार्गाने अवलंबित केली, त्या गुरुंच्या कार्यात आपण सर्वस्वाने एकरुप होऊन, आपले प्राप्त जीवन हे केवळ ऐहिक जीवन म्हणून विचारात न घेता, आपल्या जीवनात पारमार्थिक जीवन प्राप्त करण्याचे आद्यकर्तव्य आपल्याला करावयाचे आहे हे विसरता कामा नये. यासाठीच आपली नित्य कर्तव्यें करुन कार्यवेंद्रावर होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कार्यवेंद्रावर जास्तीत जास्त हजर रहाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.’ परमपूज्य विभूतींनी कार्यकेंद्रावर आपले आचरण कसे असावे याचे वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. साधन पत्रिकेत याविषयी सेवक व भक्तभाविक नियमावली या अध्यायात हे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे.

कार्यात मार्गदर्शनार्थ आलेल्या भक्त-भाविकांनाच या कार्याचे माध्यम म्हणून वंदनीय दादांनी निवडलेले आहे. हे कार्य इतके विश्वव्यापक आहे की इतरांंच्या कल्याणार्थ जर कधी कार्यवेंद्रावर येणे शक्य नसेल तरी त्याची ही तरतूद वंदनीय दादांनी केलेली आहे. त्यासंदर्भात वंदनीय दादा म्हणत, ‘श्री सद्‌गुरुंनी कार्यवेंद्रावर येणारा भक्ताची रहाती जागा ही देखील कार्यवेंद्र केले आहे’. अडचणी निवारणार्थ व इतरांच्या कल्याणासाठी ह्या घरच्या कार्यवेंद्रावर केवळ ‘हे भगवंता नारायणा’ ही प्रार्थना सर्व कुटुंबियांना सोबत म्हणावयाची आहे. विश्वकल्याणाच्या कार्याचा पसारा न करता प्रसार करण्यासाठी केवळ वंदनीय दादांनी सांगितलेले आचरण करणे आवश्यक आहे. तेव्हा आपल्या गुरुंनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करणे हे केवळ आपल्या हातात आहे. त्यासाठी कार्यवेंद्रावरुन वेळोवेळी झालेले मार्गदर्शन बहुमोलाचे असते.
Your browser does not support pdfs, click here to download the file.
Your browser does not support pdfs, click here to download the file.
Your browser does not support pdfs, click here to download the file.
Your browser does not support pdfs, click here to download the file.
Your browser does not support pdfs, click here to download the file.