Back to Top

कार्यFeature Image

वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय

याचा अल्प परिचय वंदनीय दादा व त्यांच्यदा व त्य परिचय वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय

अधिक जाणून घ्या
Feature Image

कार्यामागील भूमिका व वैशिष्ट्ये

याचा अल्प परिचय वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय वंदनीय दादा व त्य त्यांच्या कार्याचा

अधिक जाणून घ्या
Feature Image

दत्त-नाथ-सूफी पंथ

याचा अल्प परिचय वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय

अधिक जाणून घ्या
Feature Image

कार्यातील टप्पे

याचा अल्प परिचय वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय ीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय

अधिक जाणून घ्या

वंदनीय दादा व त्यांच्या कार्याचा अल्प परिचय
‘विश्वशांती’ व्हावी ही विश्वनियंत्याचीच इच्छा आहे. त्यासाठी प्रथम जगत्कल्याण होणे आवश्यक आहे आणि जगत्कल्याण म्हटले, की त्यात मानवकल्याणही अंतर्भूत असणारच. हे मानवी कल्याण वेळोवेळी त्याच्याच प्रेरणेने जन्माला येणार्‍या एखाद्या मानवी माध्यमातून ईश्वर घडवीत असतो. असे ईश्वरप्रेरित मानवकल्याणाचे कार्य करण्यासाठी श्री. दत्तात्रय भास्कर भागवत ऊर्फ श्री सद्गुरूनाथ दादा यांचा जन्म पौष अमावास्या, दि. 6 फेब्रुवारी, 1921 रोजी सातारा येथे परंपरागत दत्तभक्ती असलेल्या भागवत कुटुंबात झाला. वंदनीय दादांच्या वडिलांचे नाव भास्कर व आईचे नाव मनोरमा. ‘‘तुला पहिला पुत्र होईल, त्याचे नाव तू ‘दत्तात्रय’ ठेव!’’ असा कृपाशीर्वाद भास्कररावांना त्यांचे नाथपंथीय गुरू श्रीकोंडीबा महाराज यांच्याकडून प्राप्त झाला. शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या दादांना ‘शिकून जगाला आग लावू नकोस, तर लागलेली आग विझव’ असे बोधामृत सातार्‍याचेच अवलिया श्रीतेलीबाबा यांजकडून लहानपणीच पाजले गेले. तसेच, जवळील डोंगरावर असलेल्या श्रीभैरवनाथांच्या स्वयंभू स्थानावरून त्यांना ॐकारदीक्षा वयाच्या आठव्या वर्षी प्रथम प्राप्त झाली.

वडिलांचा बस वाहतुकीचा व्यवसाय राष्ट्रीयीकरणामुळे बंद पडल्यामुळे, कुटुंबाची जबाबदारी ज्येष्ठ पुत्र म्हणून वंदनीय दादांवर आली. तेव्हा नोकरीनिमित्त पुण्यात येऊन प्रथम 1942मध्ये मिलिटरीत इंजिनिअरिंग शाखेत ‘शॉर्ट कमिशन’ व त्यानंतर पुण्यातील ‘फोटो झिंको’ या कंपनीत त्यांनी नोकरी केली. मिलिटरीत असताना महायुद्धाच्या वेळी त्यांचे वास्तव्य इराण, इराक, जेरूसलेम, सिरिया या ठिकाणी होते. महायुद्धात एका प्रसंगी वंदनीय दादा एका बंकरमधून दुसर्‍या बंकरकडे गेले असता, पहिल्या बंकरवर बॉम्बहल्ला होऊन तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला व त्या बंकरमधील वंदनीय दादांचे काही सहकारी दगावले गेले. केवळ ईश्वरकृपेनेच आपण जिवंत आहोत याची जाणीव वंदनीय दादांना त्याच क्षणी झाली व यापुढील आयुष्य हे त्याचे असून त्याच्याच प्रेरणेने व्यतीत करावयाचे असा त्यांनी ठाम निश्चय केला. युद्ध संपल्यानंतर 1949 साली पुण्यातील वास्तव्यात, आदरणीय सिंधू देऊस्करांशी (ऊर्फ वहिनींशी) त्यांचा विवाह झाला व कालांतराने त्यांना एक पुत्ररत्न व दोन कन्यारत्नांचा लाभ झाला. वंदनीय दादांनी आपल्या वैयक्तिक कुटुंबाबरोबरच सर्व भावंडांच्या कुटुंबांची जबाबदारीही घेतली व ती यशस्विरीत्या पार पाडली. प्रपंच व परमार्थ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे वंदनीय दादांनी आपण केलेल्या नीटनेटक्या प्रपंचावरून सिद्ध करून दाखवले.

वडिलांचा बस वाहतुकीचा व्यवसाय राष्ट्रीयीकरणामुळे बंद पडल्यामुळे, कुटुंबाची जबाबदारी ज्येष्ठ पुत्र म्हणून वंदनीय दादांवर आली. तेव्हा नोकरीनिमित्त पुण्यात येऊन प्रथम 1942मध्ये मिलिटरीत इंजिनिअरिंग शाखेत ‘शॉर्ट कमिशन’ व त्यानंतर पुण्यातील ‘फोटो झिंको’ या कंपनीत त्यांनी नोकरी केली. मिलिटरीत असताना महायुद्धाच्या वेळी त्यांचे वास्तव्य इराण, इराक, जेरूसलेम, सिरिया या ठिकाणी होते. महायुद्धात एका प्रसंगी वंदनीय दादा एका बंकरमधून दुसर्‍या बंकरकडे गेले असता, पहिल्या बंकरवर बॉम्बहल्ला होऊन तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला व त्या बंकरमधील वंदनीय दादांचे काही सहकारी दगावले गेले. केवळ ईश्वरकृपेनेच आपण जिवंत आहोत याची जाणीव वंदनीय दादांना त्याच क्षणी झाली व यापुढील आयुष्य हे त्याचे असून त्याच्याच प्रेरणेने व्यतीत करावयाचे असा त्यांनी ठाम निश्चय केला. युद्ध संपल्यानंतर 1949 साली पुण्यातील वास्तव्यात, आदरणीय सिंधू देऊस्करांशी (ऊर्फ वहिनींशी) त्यांचा विवाह झाला व कालांतराने त्यांना एक पुत्ररत्न व दोन कन्यारत्नांचा लाभ झाला. वंदनीय दादांनी आपल्या वैयक्तिक कुटुंबाबरोबरच सर्व भावंडांच्या कुटुंबांची जबाबदारीही घेतली व ती यशस्विरीत्या पार पाडली. प्रपंच व परमार्थ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे वंदनीय दादांनी आपण केलेल्या नीटनेटक्या प्रपंचावरून सिद्ध करून दाखवले.

घराण्यातील परंपरागत दत्तउपासनेत एके दिवशी श्रीदत्तगुरूंच्या जागी श्रीसाईनाथ महाराजांचे दर्शन वंदनीय दादांना झाले व गुरुभेट झाल्याची जाणीव झाली. घराण्यात परंपरागत असलेली दत्तभक्ती ही सर्वसामान्य लोकांना पेलणार नाही, तेव्हा यापुढे तू प.पू. साईबाबांची सेवा कर, अशी आज्ञाही त्याच सुमारास श्रीभैरवनाथांकडून वंदनीय दादांना झाली. प.पू. बाबांचे परमशिष्य श्री अब्दुल बाबा यांच्याकडे बाबांनी देहत्यागापूर्वी एक उदीने भरलेले मडके देऊन, ‘माझा मुलगा पुढे तुझ्याकडे येईल, तेव्हा त्याला तू हे मडके दे,’ असे सांगितले होते. पुढे जेव्हा भक्तभाविकांसमवेत वंदनीय दादांना शिर्डीला जाण्याचा व श्री अब्दुल बाबांना भेटण्याचा योग आला, तेव्हा श्री अब्दुल बाबांनी ते मडके वंदनीय दादांना दिले व दादांना ‘सद्गुरूभेटीचा’ दुजोरा मिळाला.

पुढील ‘मानवकल्याणाच्या’ अलौकिक कार्याची स्थापना वंदनीय दादांनी प.पू. बाबांच्या मार्गदर्शनाखाली केली. ‘प्राप्त जन्मातील मानवी दु:खांची कारणे गतजन्मात आहेत’ या सिद्धान्ताचा अभ्यास करीत ‘वंशविमोचन’, ‘कर्मविमोचन’ व ‘ऋणमोचन’ अशी साधने त्यांनी होम-हवने, पारायणे, जप-जाप्य इत्यादी अशा दीर्घ व प्रखर तपश्चर्या व सेवेअंती सिद्ध केली. त्यासाठीचे वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन वंदनीय दादांना श्रीनवनाथांकडून, तसेच कल्याणचे हाजी मलंगबाबा, अजमेरचे शेख मुईनुद्दीन चिश्तीबाबा, बगदादचे महम्मद जिलानीबाबा, फत्तेहपूर सिक्रीचे सलीम चिश्तीबाबा, गुलबर्ग्याचे ख्वाजा बंदे नवाज व दिल्लीचे ख्वाजा कुतुबुद्दीन बाबा या सर्व सूफी विभूतींकडूनही प्राप्त झाले.

अशा रितीने दत्तपंथातील विमोचने, नाथपंथातील दीक्षा व सूफीपंथातील जीवनाचे तत्त्वज्ञान यांचे एकत्रीकरण होऊन दत्त-नाथ-सूफी तत्त्वज्ञानावर आधारित श्री साई अध्यात्मिक समितीची स्थापना पुणे येथे 1955 साली झाली व सामान्य माणसाला सहजरीत्या जीवन व्यतीत करण्याचा मार्ग मिळाला. ह्या मार्गाचे सखोल तत्त्वज्ञान वंदनीय दादांच्या ‘साधन पत्रिका’ या अखिल मानवजातीच्या धर्मग्रंथात उपलब्ध आहे. कार्याचा विस्तार होण्याच्या दृष्टीने वंदनीय दादांनी विविध ठिकाणी कार्यकेंद्रे स्थापन केली. ह्या सर्व कार्यकेंद्रांवर वरील तत्त्वज्ञानावर आधारित मार्गदर्शन आजही केले जाते. ज्या अडचणींमुळे आपण गुरुमार्गात मार्गदर्शनार्थ आलो, त्या ‘अडचणींचे आभार मानले पाहिजेत’ हे अलौकिक तत्त्वज्ञान वंदनीय दादांनी समर्थपणे मांडले. प्रापंचिक अडचणीनिमित्त मार्गदर्शनार्थ आलेल्या प्रत्येकामध्ये परमार्थाचे बीजारोपण होऊन ‘त्याचा नराचा नारायण होणार’ असे वंदनीय दादांचे अभिवचन आहे.

भावी पिढ्यांमध्ये दु:खांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ‘गर्भ-जन्मसंस्कार’, ‘उपनयनदीक्षा’, ‘ज्ञान संवेदना’ इत्यादींचे जीवनातील महत्त्व वंदनीय दादांनी सांगितले आहे. तसेच, प्रपंच व परमार्थ नीटनेटका करण्यासाठी सिद्ध ‘ॐकारसाधनेने’ शक्ती कशी प्राप्त करावी व त्या शक्तीचा उपयोग जगत्कल्याणासाठी इहजगतात, तसेच परलोकात कसा करता येईल याचेही ज्ञान देऊन ठेवले आहे. शक्तीचे संगठन व नियंत्रण करण्यासाठी पर्वरी, गोवा येथे वंदनीय दादांनी ‘श्री शक्तिपीठाची’ स्थापना केली. प्राप्त झालेल्या ऐश्वर्यामध्ये दुसर्‍याचाही वाटा आहे व मासिक प्राप्तीतून योग्य व नियोजित सेवा व दानधर्म व्हावा यासाठी ‘मासिक वर्गणी’ व ‘अल्प बचत योजना’ असे उपक्रम वंदनीय दादांनी सुरू केले. अल्पबचत योजनेचे नियोजन व्यवस्थित होण्याकरिता ‘श्री साई स्वाध्याय मंडळ’ या संस्थेची स्थापना वंदनीय दादांनी 1985 साली केली.

बेळगावनजीक बाळेकुंद्री येथील दत्तपंथीय श्रीपंतमहाराजांच्या पदांतील शब्दब्रह्म व श्रीगोरक्षनाथांनी त्यात अंतर्भूत केलेल्या नाथपंथातील सिद्ध-साधनांमुळे ‘नित्य आरती’ ही ‘आरती-साधना’ म्हणून सिद्ध झाली व त्यात विमोचन सिद्धता अंतर्भूत झाली. तसेच, जीवन-उत्पत्ती मीमांसेचे तत्त्वज्ञान वंदनीय दादांच्या माध्यमातून वेळो वेळी घेतलेल्या मुलाखतींद्वारे दिव्यपुण्य विभूतींनी मांडलेले आहे. हे सर्व तत्त्वज्ञान विस्तृतपणे ‘साधन-पत्रिका’, ‘गुरुप्रसाद’, ‘आत्मनिवेदन’, ‘ज्ञानसाधना’, ‘गुरुवाणी’, ‘ज्ञानोपासना’ ह्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. ‘गुरुप्रसाद’ हा ग्रंथ म्हणजे ‘आधुनिक गीता’ आहे. तर, ‘साधन-पत्रिका’ हा भावी काळातील ‘अखिल मानवजातीचा धर्मग्रंथ’ आहे. तसेच, ‘आत्मनिवेदन’ हा वंदनीय दादांच्या आत्म्याने केलेल्या अलौकिक ‘प्रवासाचे वर्णन’ आहे. भावी काळाचा विचार करून व शास्त्राचा आधार घेऊन वंदनीय दादांनी सिद्ध केलेल्या सर्व साधन-सिद्धता आटोपशीर, तरीही तितक्याच प्रभावी आहेत.

अशा रितीने स्थापित कार्यातील गुरुशक्ती अपेक्षेप्रमाणे कार्यान्वित होत असल्याचा अनुभव घेत समाधानाने वंदनीय दादा ज्येष्ठ वद्य पंचमी, मंगळवार, दिनांक 2 जुलै, 1991 या दिवशी शक्तिरूप झाले. सर्वसामान्य नरजन्म प्राप्त झालेल्या मनुष्याचे ‘सद्गुरू उपासनेने’ स्थित्यंतर घडवीत, त्यास निरंजन अवस्था प्राप्त करून देणारा व त्याचा ‘नराचा नारायण’ करणारा एकमेव व सर्वश्रेष्ठ ‘वंदनीय दादांचा गुरूमार्ग’ म्हणजे मानवजातीला लाभलेले एक वरदान आहे. वंदनीय दादांच्या गुरुमार्गात गुरु-शिष्य परंपरा नाही. आम्हां भक्तांची विमोचने करून आणि त्यांना आवश्यक त्या सर्व दीक्षा देऊन आपणां सर्वांना वंदनीय दादांनी सेवक अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे वंदनीय दादा आज जरी देहस्वरूपात नसले तरी या मार्गाचा गुरुभक्तांना जन्मोजन्मी अखंडित लाभ होत राहणार आहे. अर्थात, त्यासाठी आपण आपल्या कर्तव्याची जोड द्यावयास हवी.

कार्यामागील भूमिका व वैशिष्ट्ये
‘विश्वशांती’ व्हावी ही विश्वनित्यंत्याचीच इच्छा आहे. त्यासाठी प्रथम जगत्‌कल्याण होणे आवश्यक आहे आणि जगत्‌कल्याण म्हटले की, त्यात मानवकल्याण हे अंतर्भूत असणारच. हे मानवी कल्याण वेळोवेळी ईश्वर त्याच्याच प्रेरणेने जन्माला येणाऱ्या मानवी माध्यमातून घडवीत असतो. असे ईश्वरप्रेरित मानवकल्याणाचे कार्य करण्यासाठी वंदनीय श्री सद्‌गुरुनाथ दादांचा जन्म ईश्वर कृपेनेच झाला. कार्य रचनेचे पूर्ण मार्गदर्शन परमपूज्य साईनाथ महाराज तसेच श्रीनवनाथ व काही दिव्यपुण्य विभूतींच्या माध्यामातून झाले.

ज्या दिव्यपुण्य सुफी विभूतींनी वंदनीय दादांना मार्गदर्शन केले त्यापैकी एक हे ‘परमपूज्य हाजीमलंगबाबा’(कल्याण) हेही होते. पेण वेंद्रवर्धापन दिननिर्मित १९६३ साली हाजीबाबांनी त्या दिव्यपुण्य विभूतींच्या वतीने वंदनीय दादांच्या माध्यमातून घेतलेल्या मुलाखतीचा अभ्यास उद्‌बोधक ठरु शकेल. आम्हा विभूतींना ज्या क्षणी परमेश्वराच्या चराचरमय सृष्टीच्या अस्तित्वाचे ज्ञान झाले व प्राप्त जन्म हा नश्वर असून निरंतर असे जे काही आहे ते म्हणजे सद्‌गुरुकृपा या ज्ञानाची परिपूर्णता करुन घेण्यासाठी आम्ही विभूतींनी अत्यंत प्रखर व दीर्घ अशा तपश्चार्या केल्या. अशा तपश्चार्यांची इतिसफलता म्हणून आमची जीवने परिपूर्णपणे सद्‌गुरुरुप झाली व त्या जीवनात स्फूर्त परमेश्वराच्या शक्तीचा साठा निमार्ण झाला. ही अवस्था ज्या क्षणी प्राप्त झाली त्यावेळी आम्ही परिपूर्ण परमेश्वर व त्याच्या चराचरमय सृष्टीला निर्माण करुन देणारे कार्य आपल्याला प्राप्त झाले आहे, असे वाटून घेऊ लागलो. ही आमची बालरुप अज्ञानस्थिती ज्यावेळी परमेश्वराच्या निदर्शनास आली, त्यावेळी त्याने जो आत्मबोध आम्हा विभूतींना केला तो असा.

‘‘तुम्ही जरी दीर्घ तपश्चर्येअंती माझा कृपाशीर्वाद प्राप्त करुन घेतला आहे, तरी प्राप्त प्रसादाचे ज्ञान तुम्हाला माझ्यापासून होणार नाही. प्राप्त कृपाशीर्वादापासून जे ज्ञान झाले आहे, त्यात तुमची अचल श्रध्दा आहे की चराचरमय सृष्टी ज्याने निमार्ण केली व तिचे जे अव्याहत कार्य चालू आहे ते मानवी बुध्दीपलीकडचे असून, त्याचा कर्ता करविता परमेश्वर आहे. हे ज्ञान त्या कृपाशीर्वादापैकी रुपयातील दोन आणे आहे. जो कृपाप्रसाद तुम्हाला दिला आहे, तो परिपूर्ण एक रुपया असून राहिलेल्या चौदा आण्याबद्दल जे ज्ञान तुम्हाला पाहिजे आहे, ते प्राप्त करुन घेण्यासाठी तुम्हाला परलोकात मुक्तावस्था प्राप्त करुन घेऊन होणारे नाही. तरी ह्यासाठी पुनश्च तुम्ही सर्व विभूतींनी जन्मत्रऋणानुबंधाप्रमाणे काया, वाचा, मनाची प्राप्ती करुन न घेता, पारलौकिक तत्त्वाप्रमाणे कोणातरी उत्तम अशा मध्यस्थाकरवी ज्ञान प्राप्त करुन घेण्याचे कार्य निर्माण करावे. ही कार्यप्रवृत्ती ज्या क्षणी तुमच्याकडे निर्माण होईल, त्यावेळी मृत्युलोकातील बहुसंख्य भक्तभाविक आपल्या जीवनात सुख दुःखाबद्दल विचारणा करण्यास येतील. त्यांना प्राप्त जीवनात निर्माण झालेली सुखदुःखे का निर्माण झाली, ह्याची त्रऋणानुबंध मीमांसा माहीत नसल्यामुळे ते तुमच्या सारखेच अज्ञान प्रगट करुन काहीतरी सुखाचा ठेवा आपल्याला मिळावा अशा अपेक्षा जमेस धरुन, तुमच्या उदोउदो करण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुम्ही माझ्याशी एकरुप झाला असून, जन्मकर्मत्रऋणानुबंधापासून माझ्या कृपाशीर्वादाने तुम्ही मुक्त झाला आहात. तेव्हा जगतात तुमचा नावलौकिक व्हावा, तुम्ही खूप मोठे आहात असा भास निर्माण व्हावा व लोकांना दिलेल्या कृपाशीर्वादाने लाभलेले ऐश्वर्य आपल्याही अल्पांशाने भोगायला मिळावे, अशा अपेक्षा करुन जर कार्याला प्रवृत्त व्हाल, तर चौदा आणे ज्ञान माझ्या कृपाशीर्वादाने आपणा विभूतींना पाहिजे आहे, ते मिळणार नाही.’’

  ‘‘माझ्या आशीर्वादाच्या ज्ञानार्थ या इहलोकी तुमची भूमिका अगदी स्पष्ट, निरपेक्ष, निःस्वार्थ हवी. कोणत्याही देवदेवतेबद्दल अनादर व्यक्त करणारी, धर्मधर्मांतराबद्दल माझ्या आशीर्वादाच्या ज्ञानार्थ या इहलोकी तुमची भूमिका अगदी स्पष्ट, निरपेक्ष, निःस्वार्थ हवी. कोणत्याही देवदेवतेबद्दल अनादर व्यक्त करणारी, धर्मधर्मांतराबद्दल उपहास करणारी, मानवी ज्ञातीबद्दल भेदभाव निर्माण करणारी, अशी असून चालणार नाही सर्वांभूती आत्मा एकच आहे या आदितत्त्वाप्रमाणे, मानवी सहिष्णुतावाद निर्माण करुन देण्याचे कार्य तुम्हाला करावयाचे आहे. आता चौदा आणे कृपाशीर्वादाबद्दल ज्ञान होण्यासाठी जी मीमांसा आवश्यक आहे, तिचा लाभ तुम्ही करुन घ्या. तो असा की, मृत्युलोकी प्रत्येक मानव आपल्या जन्मजन्मांतरात काया, वाचा, मनाने घडलेल्या पातकप्रमादामुळे, ज्ञानअज्ञानामुळे आपला कर्मत्रऋणानुबंध वाढवत असून, जीवास मुक्तावस्था प्राप्त करुन घेण्याचा जो धर्म अविमुक्त व अविनाशी असा आहे, तो कर्मत्रऋणानुबंधामुळे त्या जीवास सुलभपणे प्राप्त होत नाही. आज इहलोकी प्राप्त झालेले जीवन, ज्या संचितावस्थेमधील सत्कर्मांमुळे प्राप्त झालेले आहे व त्या संचितावस्थेमधील सत्कर्मांमुळे आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारामुळे सुख-शांती मिळत आहे. हे जीवन व्यतीत होत असताना जन्मजन्मांतरात जो सत्कर्म संचय होतो, तोच केवळ उपभोगला जाऊन ज्ञानअज्ञानाने घडलेली जन्मजन्मांतरातील पातके तथा प्रमाद शिल्लक राहतात. अशा शिल्लक राहिलेल्या जन्मजन्मांतरातील पातकप्रमादामुळे मनुष्य दुःखी होऊन, सुखाबद्दलच्या अज्ञानाने निर्माण केलेल्या अपेक्षांबद्दल विचारण्यास येतो. ही विचारणा ज्या संचितावस्थेमधील दुष्कर्मामुळे करणे भाग पडते, त्याचा अर्थ सूज्ञ मानवांना समजत नाही. कारण दुष्कर्म हे जरी जन्मजन्मांतरात करण्यास आपणच करणीभूत झालो असलो, तरी त्याचे ज्ञान झाल्यावर सत्कर्मही आपणच करणार आहोत. जेव्हा संचितावस्थेमधील जीवन जगण्यास अनुकूल सत्कर्म कमी होते, त्यावेळी संचितावस्थेमधील कर्म वाढावे या इच्छित हेतूने, दुष्कर्म हे कौटंुबिक अडीअडचण, अशांतता निर्माण करण्यास सुरुवात करते. याचा अर्थ सूज्ञ भक्तांना समजत नसल्यामुळे, आशीर्वाद हा संकट निरसनार्थ उपयोगात आणावयाचा आहे, असा अर्थ लावला जातो. पण सद्‌गुरुकृपाशीर्वाद हा सत्कर्म प्रवृत्तीसाठी असून, त्याने संचितावस्थेतील दुष्कर्माचे विमोचन करावयाचे आहे, ही जबाबदारी शेकडो वेळा आशीर्वाद घेऊनसुध्दा किंवा मुलाखतींचा लाभ घेऊनसुध्दा भक्तभाविक कर्तव्य म्हणून करण्यास तयार होत नाहीत. अशी ही जी जीवनमीमांसा, की जी जन्मजन्मांतरातील काया-वाचा-मनाने ज्ञानअज्ञानाने घडलेला पातकप्रमादामुळे आज दुःखास कारणीभूत झाली आहे, अशा संचितावस्थेतील कर्मत्रऋणानुबंधाचे विमोचन जर तुम्ही विभूतींनी आपल्या कृपाशीर्वादाने करुन दिलेत, तर या कृपाप्रसादामुळे जन्मजन्मांतरातील अघोर अशा पापाचे क्षालन कृपाशीर्वाद करु शकतो, हे ज्ञान तुम्हाला तेथील मानवाच्या जीवनाची सेवा करण्यानेच प्राप्त होईल. तेव्हा माझा तो परिपूर्ण कृपाशीर्वाद तुम्हाला आहे, याचे ज्ञान माझेजवळ बसून होणार नसल्याने तुम्ही परलोकातून इहलोकी जाण्यास तत्पर व्हा व मी चराचरमय सृष्टी निर्माण करीत असताना प्रत्यक्ष मानवाच्या ठिकाणी मी जीव या स्वरुपात राहूनसुध्दा, मनुष्य अज्ञानाने आपल्या बहुमोल जीवनाचा नाश करीत असून, माझ्या अस्तित्वाला आज पारखा झाला आहे. म्हणून जीवनातील सुखदुःखाबद्दल विचारणा करण्यास येणारा बहुसंख्य समाज हा श्रध्दा, भक्ती, सबुरी, निष्ठा इत्यादींचा अभाव असणारा असेल. तुम्हा विभूतींचा भाव माझ्याबद्दल परमोच्च अशा कोटीत एकरुप झाला आहे. तेव्हा अशा भक्तिहीन, निष्ठाहीन, सबुरीहीन माणसाला सुध्दा जवळ करुन तुम्हाला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा लाभ देऊन, त्या मानवाच्या ठिकाणी क्षणिक भावना निर्माण करुन, ती स्फूर्त भावना होईपर्यंत आपल्या सेवेत तत्पर असा, म्हणजे माझ्यापासून मिळविलेल्या कृपाशीर्वादाचा लाभ व त्याचे ज्ञान तुम्हा विभूतींना होईल व हेच कार्य जगात मानवीकल्याणाचे प्रतीक म्हणून निर्माण व्हावे असा माझा तुम्हा पुण्यविभूतींना आशीर्वाद आहे.’’

वरील मुलाखतीवरुन खालील बाबी स्पष्ट होतात.

 1. या कार्याची स्थापना ईश्वर प्रेरीत असून दिव्यपुण्य विभूतींच्या सहाय्याने झालेली आहे.
 2. मनुष्याच्या जीवनात दुःखं निर्माण होण्याची मुख्य कारणे म्हणजे त्याच्या जन्मजन्मांतरातील काय-वाचा-मनाचे घडलेले व शिल्लक राहिलेले पातक-प्रमाद व ज्ञानअज्ञानाने वाढवून ठेवलेला कर्मत्रऋणानुबंध होय.
 3. जीवाचा नैसर्गिक धर्म अविमुक्त व अविनाशी असा आहे. परंतु कर्मत्रऋणानुबंधांमुळे त्या जीवास तो धर्म सुलभपण प्राप्त होत नाही.
 4. जीवन व्यतीत होत असताना जन्मजन्मांतरात जो सत्कर्म संचय होतो तोच केवळ उपभोगला जातो व ज्ञानअज्ञानाने घडलेली पातक-प्रमाद शिल्लक रहातात व ती दुःखे निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.
 5. निर्माण झालेल्या दुःखांचे निरसन करण्यास लागणारे सत्कर्मही आपणास निर्माण करावे लागते.
 6. जीवन जगण्यास जेव्हा संचितावस्थेमधील सत्कर्म कमी पडते तेव्हा ते वाढावे ह्या सद्‌हेतूने दुष्कर्म हे दुःख निर्माण करण्यास सुरुवात करते.
 7. सद्‌गुरुकृपाशीर्वाद हा सत्कर्म प्रवृत्तीसाठी असून त्याने संचितावस्थेतील दुष्कर्माचे विमोचन करावयाचे आहे.
 8. दोन आणे - चराचरमय सृष्टी ही परमेश्वराने निर्माण केली असून तिचे जे अव्याहत कार्य चालू आहे, हे मानवी बुध्दीच्या पलीकडचे आहे. हे ज्ञान जे विभूतींपाशी आहे. ते दोनच आणे आहे असे परमेश्वर म्हणतो.
  चौदा आणे - प्राप्त कृपाप्रसादामुळे मनुष्याच्या जन्मजन्मांतरातील कर्मत्रऋणानुबंधाचे विमोचन होऊ शकते व अघोर पापांचे शालन होऊ शकते. हे ज्ञान मानवी जीवनाची सेवा करण्यानेच विभूतींना प्राप्त होणार आहे असे परमेश्वराचे मार्गदर्शन आहे.
 9. दिव्यपुण्य विभूतींनी इहलोकात करावयाचे कार्य हे काया-वाचा-मनाची प्राप्ती न करता (प्रत्यक्ष जन्म न घेता) एका उत्तम मध्यस्थाकरवी करावयाचे आहे.
 10. एकंदरीत मनुष्य हा भक्तीहीन, निष्ठाहीन, सबुरीहीन, श्रध्दाहीन झाला असूनही त्याला जवळ घेऊन, ज्ञान देऊन (विभूतींना प्राप्त झालेले) त्याच्या ठिकाणी क्षणिक भावना निर्माण करुन, ती स्फूर्त होईपर्यत सेवा करावी. तेव्हाच उरलेले चौदा आण्यांचे ज्ञान प्राप्त होईल.
 11. मानवीकल्याणाचे प्रतीक म्हणून निर्माण करावयाचे कार्य हे
  • अ) अगदी स्पष्ट, निरपेक्ष, निःस्वार्थ असले पाहिजे.
  • ब) कोणत्याही देवदेवताबद्दल अनादर व्यक्त करणारे असता कामा नये.
  • क) धर्मधर्मातराबदल उपहास करणारे किंवा कोणत्याही प्रकारे भेदभाव निर्माण करणारे नसावे.
  • ड) सर्वांभूती आत्मा एकच आहे, ह्या आदितत्वावर आधारीत मानवी सहिष्णुतावाद निर्माण करणारे असावे.

वंदनीय दादांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये

 1. कार्यातील सर्व दिव्यपुण्य विभूतींना वंदनीय दादांचे माध्यम सर्वोत्परी योग्य वाटल्याने ह्या कार्याची स्थापना त्यांच्या माध्यमातून झाली.
 2. इहजन्मात दुःखें निर्माण होण्याची प्रमुख कारणे म्हणजे, गतजन्मात मनुष्याने न केलेली कर्तव्ये, अयोग्य कर्मे व वंशातून प्रवाहित झालेले दोष. जेव्हा ही कारणे वंदनीय दादांनी अभ्यासली, तेव्हा त्या दुःखांच्या निवारणार्थ त्यांनी त्रऋणमोचन, कर्मविमोचन, वंशविमोचन अशी प्रखर साधने कठोर परिश्रमाअंती सिद्ध केली. गतजन्मांतील कर्माच्या प्रखरतेनुसार अनुभवयेण्यास जरी कमी-अधिक वेळ लागला, तरी योग्य ती फल प्राप्ती होते व कुटुंबास एकंदरीत सुख- शांती-समाधान लाभते हे निश्चित.
 3. ‘प्राप्त जन्मातील दुःखांची बहुतांशी कारणे ही गतजन्मांत असतात व त्या दुःखांचे निवारण योग्य प्रायश्चित्ताने व सेवेने करता येते, तसेच ते स्वतःच केले पाहिजे’ हा ह्या कार्यातील हा ह्या कार्यातील महत्त्वाचा सिद्धान्त आहे. तसेच योग्य उपासना, सेवा व धर्माचरणाने स्वतःचा संपूर्ण विकास करुन घेता येतो हेही सिध्द झाले आहे.
 4. ‘सर्वांभूती आत्मा एकच आहे’ हे कार्याचे ब्रीद असल्याने या मार्गात गरीब-श्रीमंत, जेष्ठ- कनिष्ठ, शाकाहारी-मांसाहारी, जात-पात किंवा अन्य कोणताही भेदभाव नाही. औपचाराचे अवडंबर न माजविता सर्वसामान्य माणसाला काळ-वेळ, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या झेपतील अशीच सोप्यातसोपी निराकरणे व पूजनविधीपद्धत, येथे सुचविली जातात.
 5. संपूर्ण कार्यपद्धत ही शास्त्राधारित असून दत्त - नाथ - सूफी पंथांतील आवश्यक अशी सर्व तत्त्वे कार्यपद्धतीत अंतर्भूत आहेत.
 6. ‘नीटनेटका प्रपंच करण्यातच परमार्थ सामावलेला असतो याची जाणीव करुन देणे व भक्तभाविकांना परमार्थाची गोडी लावून त्यांचे जीवन ईश्वरमय करणे’ हे ह्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसे झाल्यानेच विश्वनियंत्याचे ‘विश्वशांती’ चे ध्येय साध्य होईल.

दत्त-नाथ-सूफी पंथ

श्री साई अध्यात्मिक समितीच्या ज्या कार्याचा लाभ आज आपण घेत आहोत, त्या कार्ययोजनेचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची जाणीव आपणांस असणे महत्त्वाचे आहे. काही हजारो वर्षांपूर्वी जे तीन पंथ अस्तित्वात आले, ते म्हणजे ‘दत्तपंथ’, ‘नाथपंथ’, ‘सूफीपंथ’. आजही त्यांचे अस्तित्व जीवनात अनुभवावयास येते.

या तीन पंथांचा नेमका ‘धर्म काय’, त्यांचे ‘कर्म काय’ किंवा त्यांचे ‘मर्म काय’ हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाहेरच्या जगतामध्ये या पंथांसंबंधीचे विविध लिखाण उपलब्ध आहे. परंतु, एखाद्या पंथातून ज्याने अनुभवसिद्ध अशा अवस्था, आपल्या देहिक माध्यमाद्वारे अनुभवल्या असतील असाच साधक त्या पंथात अंतर्भूत असलेल्या तत्त्वज्ञानाचा आविष्कार व्यक्त करू शकतो. या तिन्ही पंथांचा एकत्रित अनुभव ज्यांनी घेतला असा एकमेव साधक म्हणजे आपले ‘वंदनीय श्री सद्गुरूनाथ दादा’. त्या अनुभवांसाठी व सिद्धान्तासाठी त्यांनी आपले आयुष्य या तीन पंथांना समर्पित केले.

सर्वसामान्य माणसाला एका जन्मामध्ये या तीन पंथांपैकी एका पंथालादेखील साध्य करणे कठीणच आहे. परंतु, या तीन पंथांना अशी एक ईश्वरी प्रेरणा झाली, की भवितव्यात तुम्ही जर वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून ह्या विश्वामध्ये कार्य करीत राहाल, तर ते कार्य उदयाला येण्यास विलंब लागेल. या ईश्वरी संकेतामुळे या तीन पंथांनी एकत्र येऊन आज्ञेनुसार कार्य करण्याचे ठरविले व सगुणरूपात कार्य स्थापण्यासाठी वंदनीय दादांना माध्यम निवडलेे. अशा रितीने वंदनीय दादांच्या माध्यमातून २५०० वर्षांपेक्षाही जास्त परंपरा असणार्‍या दत्त-नाथ-सूफी पंथांचा जो ‘बहुमोल ठेवा’ होता, तो आपल्याला सहजगत्या प्राप्त झाला.

या तिन्ही पंथांनी लोककल्याणाच्या कार्यार्थ ज्या साधनपद्धती निर्माण केल्या, त्या वंदनीय दादांच्या माध्यमातून सिद्ध केल्या व त्या आपल्या जीवनात अखंड प्रवाहित करण्याची योजना आखली.

 1. दत्तपंथ : जो आपल्या हाकेला ओ देतो तो ‘दत्त’. भाक घातली की जो दत्त म्हणून उभा राहतो तो ‘दत्त’. ॐकार हे तत्त्व असेच आहे. मानवी जीवनोद्धारार्थ ज्या काही कार्यपद्धती किंवा विमोचनादी विधी वंदनीय दादांनी कार्यात विचारात घेतल्या, त्या दत्त पंथातील आहेत.
 2. नाथपंथ : ‘आपण जन्माला का आलो, आपल्या जन्माचे कारण काय, आपल्या जन्माचे सार्थक कशात आहे’, हे आपल्याला अज्ञानामुळे व कर्मबंधनामुळे कळत नाही. त्या कर्मबंधनातील अंध:कार दूर करून जो पंथ आपल्याला सनाथ करतो, तो ‘नाथपंथ’. आपल्या कार्यपद्धतीतील ज्या सिद्ध-सिद्धान्त पद्धती आहेत, त्या नाथपंथातील तत्त्वांवर आधारित आहेत.
 3. सूफीपंथ : मानवी जीवन साकार करणारा पंथ म्हणजे ‘सूफीपंथ’. आपल्या कार्याची जी फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान आहे, ते सूफीपंथातील तत्त्वांवर आधारित आहे.आपल्या गुरुमार्गातील साधकाला गुरुदीक्षापरत्वे दत्तपंथातील दीक्षारूपी बीज प्राप्त होऊन, त्या बीजाला नाथपंथातील सिद्ध-सिद्धान्त पद्धतीमुळे आकार प्राप्त होतो व तो सूफीपंथाच्या ध्येयामुळे दुसर्‍यांच्या कल्याणार्थ ते बीज साकार होते. हा अनुभव साधकाला तेव्हाच येतो, जेव्हा तो साधक इतरांच्या हितासाठी कार्य करतो. थोडक्यात, साधकाने दत्तपंथाची दीक्षा घेतल्यानंतर नाथपंथामध्ये जो सामावतो, तो साधक प्राप्त झालेल्या साधनांचा उपयोग केवळ आपल्या कुटुंबाच्या व भावी पिढ्यांकरिता न करता इतर सर्वांच्या कल्याणार्थ (जनकल्याणार्थ) जेव्हा करतो, तेव्हा सूफीपंथ त्याच्या माध्यमातून कार्य करतो. अशी ही तिन्ही पंथांच्या कार्यातील ‘योजना’ आहे.

सूफीपंथाचा धर्म ‘दया-क्षमा-शांती’ हा आहे. हा धर्म साधकामध्ये कार्यान्वित होण्यासाठी त्या साधकाला दत्तपंथातील दीक्षा ग्रहण करून नाथपंथातील सिद्ध-सिद्धान्त पद्धतीत परिपूर्ण व्हावयास पाहिजे. थोडक्यात, तीनही पंथांचे मर्म एकच आहे व ते म्हणजे ‘मानवी जीवनाचा विकास’ व त्या योगे ‘मानव कल्याण’ हे होय ते खालील कोष्टकात स्पष्ट होते.

सूफीपंथाचा धर्म ‘दया-क्षमा-शांती’ हा आहे. हा धर्म साधकामध्ये कार्यान्वित होण्यासाठी त्या साधकाला दत्तपंथातील दीक्षा ग्रहण करून नाथपंथातील सिद्ध-सिद्धान्त पद्धतीत परिपूर्ण व्हावयास पाहिजे. थोडक्यात, तीनही पंथांचे मर्म एकच आहे व ते म्हणजे ‘मानवी जीवनाचा विकास’ व त्या योगे ‘मानव कल्याण’ हे होय ते खालील कोष्टकात स्पष्ट होते.

पंथ → दत्त पंथ नाथ पंथ सूफी पंथ
अवस्था → बीज आकार साकार
स्थिती → उत्पत्ती स्थिती लय
ध्येय → गुरुदीक्षा धारण उमगले जन्माचे कारण कल्याण