कामकाज

आदरणीय भक्तभाविक,

                      वंदनीय श्री सद्‌गुरुनाथ दादा कृपास्थापित व श्री सद्‌गुरुज एज्युकेशनल ॲन्ड वेलफेअर ट्रस्ट संचालित ‘साईकृपा’ या दादर-मुंबई कार्यकेंद्रावर आपले स्वागत. आपण कोणत्याही अडचणीमुळे अथवा प्रश्नार्थ इथे आला असाल तर आपली अडचण दूर करण्याचा किंवा आपल्या प्रश्नाचे समाधानपूर्वक उत्तर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. अडचण किंवा प्रश्न निवारणार्थ या निराकरण पद्धतीला ‘कामकाज’ असे म्हणतात. कार्यकेंद्रावर कार्य करणाऱ्या सेवकांच्या माध्यमातून आपल्याला कामकाजाचा लाभ घेता येईल. दादर कार्यकेंद्रावर ऑनलाईन  / Online (फोन वरून) किंवा ऑफलाईन / Offline (प्रत्यक्ष हजर राहून) अशा दोन्ही प्रकारच्या कामकाजाची सोय आहे.

आपल्याला या कार्याचा लाभ जास्तीत जास्त व्यवस्थित घेता यावा या दृष्टीने खाली काही सूचना दिल्या आहेत.

१. कार्यकेंद्रावर साजरे होणारे उत्सव अथवा विशेष दिवस वगळता प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी, शनिवारी व रविवारी कामकाज होते. (सध्या फक्त शनिवारी व रविवारी कामकाज होते.)

२. कोणत्याही महिन्याच्या कामकाजाचे नंबर घेणे किंवा नाव नोंदणी, त्या महिन्याच्या आधीच्या महिन्याच्या १६ तारखेपासून सुरु होते.

३. ज्या व्यक्तीची अडचण / प्रश्न असेल त्याच्या नावाने एकच नंबर घ्यावा एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींचे जर प्रश्न असतील तर केवळ कुटुंबप्रमुखाच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने एकच नंबर घ्यावा. परंतु कितीही प्रश्न विचारता येतात.

४. कामकाजासाठी निर्देशित केलेल्या प्रत्येक दिवशी केवळ १५ नावे ऑनलाईन (फोनवरून) कामकाजासाठी व १० नावे ऑफलाईन (प्रत्यक्ष हजर राहून) कामकाजासाठी स्वीकारली जातात. दोन्ही प्रकारच्या कामकाजाची नाव नोंदणी केवळ ऑनलाईनच करता येते.

५. नाव नोंदणी प्रक्रिया :

  (अ)   https://www.dadarkaryakendra.org ह्या वेबसाईट वर जाऊन ‘कामकाज’ या सत्रावर जाणे.

  (ब) सर्व प्रथम कामकाजाचे महिन्याचे वेळापत्रक (Schedule) पाहुन, आपल्याला सोयीस्कर असा कामकाजाचा दिवस निश्चित करून, तो दिवस  सिलेक्ट (select) करावा.

   (क) त्यानंतर ऑनलाईन / Online की ऑफलाईन / Offline कामकाज करायचे आहे त्याप्रमाणे तो पर्याय (option) क्लिक (click) करावा.

    (ड) त्यानंतर ‘प्राथमिक माहिती देणारा फॉर्म’ भरावा.

    (इ)  त्यानंतर रू. ५० एवढे योगदान (non- refundable) दिलेल्या सूचनांप्रमाणे भरावे. (या रक्कमेत भक्तांच्या वतीने एक श्रीफळ, दोन पाने, एक अखंड सुपारी, रू.२१ दक्षिणा एवढे ‘अर्पण साहित्य, हे परमपूज्य बाबांच्या चरणी कामकाजाच्या दिवशी ठेवण्यात येते). हे योगदान Google Pay/ Phone Pay /Paytm, इ.मार्फत भरता येईल.

    (इ)  पैसे भरल्यावर TICKET Je CONFIRMATION EMAIL आपणास प्राप्त होईल.

६.    (अ)  ऑनलाईन कामकाजासाठी नाव नोंदणी केलेल्यानीकामकाजाच्या दिवशी सकाळी ७.४५ वाजेपर्यत शुचिर्भूत होऊन, घरात योग्य ठिकाणी बसावे, जेणेकरून आरती साधनेचा लाभ Zoom अथवा Youtube वरून घरूनच घेता येईल.

         (ब) ऑफलाईन कामकाजासाठी नाव नोंदणी केलेल्यानी, दादर कार्यकेंद्रावर सकाळी ७.४५ वाजेपर्यत पोचावे जेणेकरून आरती साधनेचा लाभ प्रत्यक्ष केंद्रावर घेता येईल.

७. सकाळी बरोबर ८.०० वाजता आरती साधनेस सुरुवात होईल. कामकाजाच्या परिपूर्ण लाभासाठी आरती साधनेचा लाभ घेणे अतिशय महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवावे.

८. आरती साधना संपन्न झाल्यावर आवश्यक त्या सूचना दिल्या जातील व नंतर Online Zoom / Youtube प्रक्षेपण बंद होईल.

९. त्यानंतर कामकाजास सकाळी ९.१५ ते ९.३० यादरम्यान सुरुवात होईल. दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज समानांतर (simultaneously) केले जाईल.

    (अ) ऑनलाईन कामकाजासाठी आपल्या नोंदणीक्रमांकानुसार आपल्याला कार्यकेंद्रावरुन फोन येईल वमार्गदर्शन करणाऱ्या सेवकाशी आपल्याला बोलता येईल.

    (ब)  तसेच ऑफलाईन कामकाजासाठी आपल्या नोंदणीक्रमांकानुसार आपले नाव उच्चारले जाईल व मार्गदर्शन करणाऱ्या सेवकांसमोर बसून आपल्याला बोलता येईल.

१०. कामकाजाच्या वेळी आपले सांगणे स्पष्ट व सुटसुटीत पणआपल्याअडचणीविषयी /प्रश्नाविषयी सर्व माहिती देणारे असावे. आपल्या प्रश्नांची चर्चा सेवकांमध्ये किंवा इतरnभक्तभाविकांमध्ये कोठेही होणार नाही याची खात्री बाळगावी व निःसंकोचपणे बोलावे.

११. संपूर्ण कामकाज हे नोंदणीक्रमांकानुसारच केले जाते. त्यामुळेआपला नंबर येण्यास विलंब झाल्यास कार्यकेंद्रावर फोन करून किंवा आपण कार्यकेंद्रावर प्रत्यक्ष असल्यास सेवकांकडे विचारणा करु नये.

१२. आपल्या प्रश्नानुसार निराकरण सुचवले जाईल.

   (अ)  सुचित केलेल्या सेवेचा मजकूर Whatsapp केला जाईल. (ऑनलाईनसाठी)

   (ब) सुचित केलेल्या सेवेच्या मजकूराचा कागद दिला जाईल. (ऑफलाईनसाठी)

१३. मार्गदर्शित निराकरण हे केवळ तत्कालीन अडचणी / प्रश्न निवारणार्थ दिले जात नसून, कुटुंबाच्या आजच्या व भावी काळातील सुख-समाधानासाठी दिले जाते हे लक्षात घ्यावे.

१४. दिलेली सेवा मनोभावे व एकाग्रतेने दुपारी बाराच्या आत करावी.

१५. साधारपणे पाच  / अकरा आठवड्यांची सेवा सांगितली जाते. त्यानंतर मार्गदर्शनानुसार पुन्हा नाव नोंदणी करून, कामकाजात मार्गदर्शन घेणे आवश्यक असते.

१६. स्त्रियांची मासिक पाळी अथवा अन्य कोणत्याही कारणाने सूचित केलेली सेवा कांही दिवशी करता आली नाही तर तेवढे दिवस वाढवून सेवा पुढे करावी.

सूचना :  कार्यकेंद्रावरील ‘आरती साधना’ व इतर सर्व उपक्रमांचा ऑनलाईन घरबसल्या लाभ घेण्यासाठी,

अ) ·  आपल्या मोबाईल मधील Play Store मधून Zoom अँप डाउन करा

  •  खालील लिंक आपल्या मोबाईल वर कॉपी करून घ्या व त्यावर क्लिक करा.

                                https://bit.ly/3lsPAHM

                                        किंवा

  • Zoom अँप ओपन करून MeetingI.D.:6038935609 Password:654123 टाकून join करा

अथवा

      ब) Youtube वर जाऊन dadarkaryakendra (Live) यावरुन लाभ घ्यावा.

कार्यकेंद्रावरील सध्याचे उपक्रम (१ नोव्हेंबर २०२१ पासून) :

१) आरती साधना प्रत्येक शनिवारी व रविवारी : सकाळी ८.०० ते ९.००
प्रत्येक बुधवारी : सकाळी ८.०० ते ८.३५
प्रत्येक मंगळवारी व गुरुवारी : सायं ७.०० ते ७.४५
२) मुलाखत साधना प्रत्येक गुरुवारी, सायं ७.४५ ते ८.१५
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी, सायं ५.३० ते ८.००
३) ॐकार साधना प्रत्येक शनिवारी व रविवारीः सकाळी ७.०० ते ७.४५
प्रत्येक बुधवारी : सकाळी ८.४५ ते ९.३०
४) ज्ञानसंवेदना वर्ग प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी, सकाळी ९.१५ ते ११.००

॥ शुभं भवतु ॥

All Rights reserved © 2020 Dadar Karyakendra